प्रसिद्ध चित्रकार नारायण शेळके सर यांच्या निसर्ग चित्राचे मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन
ता. २६ एप्रिल ते २ मे 2022 या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे.
संजय उकिरडे : सह्याद्री माझा

नारायण शेळके सर
अहमदनगर : मुंबईतील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरी मध्ये प्रसिद्ध चित्रकार नारायण शेळके सर यांच्या निसर्गचित्र कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, मंगळवार ता. २६ एप्रिल ते २ मे या कालावधीत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे.
नारायण शेळके यांच्या निसर्गचित्रात जिवंतपणा असतो. कुंचला व रंगांच्या पिळवटून टाकणाऱ्या संमीलन ओलसर घर्षणातून निसर्गचित्र साकारतात. शेळके यांना शालेय जीवनापासून निसर्गात जाऊन निसर्गचित्र चितारण्याचा छंद जडला. या वातावरणात प्रेरणेमुळे कला उमगत जाताना त्यांच्यामधील आतला कलाकार सतत जागा राहिला.

संग्रहित छायाचित्र
शेळके यांनी चित्रकलेची सर्वोच्च पदवी मिळवली आहे. नाशिकच्या आद्य चित्रकलेचे जनक शिवाजी तुपे सर यांच्या प्रभावात त्यांनी आपली कला जोपासली. श्री.शेळके यांनी आपली एक वेगळी शैली निर्माण केली आहे.
नाशिक परिसरातील गंगाघाट, गल्ली-बोळ, मंदिरे, मारुती, वाहणार पाणी, जवळची वावरणारी माणसे, यावर सुंदर चित्रे साकारली आहेत. शेळके यांची चित्रे हे छायाचित्रापेक्षा रंगसंगतीने वेधक दृष्टी देतात. त्यांची चित्रे आपल्याशी बोलतानाचा भास होतो.
त्यांची देश विदेशात कला प्रदर्शने झाली आहेत. मनसे अध्यक्ष व व्यंगचित्रकार राज ठाकरे, संगीतकार अजय अतुल तसेच अनेक मान्यवरांनी त्यांच्या चित्र प्रदर्शनास भेट देत त्यांच्या कलाकृतीचे कौतुक केले आहे. त्यांना अनेक राज्य व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
All paintings are very nice 👌👌👍