WhatsApp Image 2022-06-12 at 7.16.45 PM

बेलापूर बदगी येथे सहा हजार लिटर आमटी, चाळीस हजार चपात्यांचा प्रसाद

बेलापूर बदगी येथे सहा हजार लिटर आमटी, चाळीस हजार चपात्यांचा प्रसाद

बेलापूर बदगी येथे योगी रामदासबाबा पुण्यतिथी सोहळ्या निमीत्त महाप्रसादाचे आयोजन, आमटी पोळीचा महाप्रसाद, नामवंत किर्तनकारांची किर्तने

राजेंद्र उकीरडे : सह्याद्री माझा

बेलापूर (ता. अकोले, जि. अहमदनगर) : येथे योगी रामदासबाबा यांच्या १५३ व्या पुण्यतिथी सोहळ्या निमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत आज (जेष्ठ शु. द्वादशी) गावातून प्रत्येक घरातून भाविकांना प्रसादासाठी दिलेल्या चपात्या (चाळीस हजार चपात्या) आणि सहा हजार लिटर आमटीचा (दहा कढई आमटी) वैशिष्ठ्यपूर्ण महाप्रसादाचा आस्वाद आज आणि उद्या उपस्थित भाविकांना चाखायला मिळणार आहे. मोठ्या श्रद्धेने ह्या प्रसादाचा आस्वाद भाविकांनी आज सायांकाळी घेतला..

सप्ताह काळात अनेक नामवंतांच्या कीर्तन, प्रवचनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यात आप्पासाहेब महाराज महाले, निलेश महाराज बोडके, अक्षय महाराज बोडके, डाॅ. एम.डी. फापाळे, बबन महाराज गोपाळे, नामदेव महाराज फापाळे, पांडुरंग महाराज उकिरडे, अमोल महाराज वाकळे, सोमनाथ महाराज भोर यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. तर पुरुषोत्तम महाराज पाटील (आळंदी), दत्तात्रय महाराज भोर (माळेगाव पठार), गणेश महाराज कांगणे (आळंदी), प्रकाश महाराज साठे (बीड), अक्रुर महाराज साखरे (बीड), चंद्रकांत महाराज खळेकर (आळंदी), समाधान महाराज शर्मा (बीड), निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्याकाल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.

सप्ताहाच्या निमित्ताने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने संध्याकाळी मंदीर परिसरात एक रोषणाई व भावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. अशी माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली आज सकाळ पासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनात ग्रामस्थ पुणे, मुंबईकर यांच्या सह सर्वच झटताना दिसत होते. संध्याकाळी पालखी सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांना आमटी चपातीचा महाप्रसाद देण्यात आला. यावेळी परगावी नोकरी निमीत्ताने गेलेले नोकरदार जेवणानंतरचे भांडी-कुंडी स्वच्छ करीत होते हे
विशेष.

देवस्थान समिती, ग्रामस्थ, पुणे, मुंबईकर यांच्यासह  राज्यभरातून आलेले बेलापूरकर सकाळ पासून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत होते. बेलापूर येथील आमटी बनविणारे आचारी किसन फापाळे हे गेल्या 49 वर्षापासून महाप्रसादासाठी लागणारी आमटी बनवत असून याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी मला यात्रोत्सवाच्या निमित्त बेलापूर येथे येत असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने आमटी बनविण्याची कला शिकवली आहे. दरवर्षी मी आमटी मध्ये प्रत्येक मसाल्यात 50 ग्रॅमची वाढ करत आलो असून योगी रामदास बाबांच्या कृपेने आज 49 वर्षानंतर ही माझ्या हाताने पुर्वी जशी आमटी तयार व्हायची तशीच आजही होत आहे. मठ, तूर, हरभरा, मूग अशा विविध डाळींचा वापर करत ही आमटी बनविली जाते. यासाठी आठ दिवस विविध मसाल्यांचे नियोजन करावे लागते. बेलापूरची आमटी चपाती हा प्रसाद प्रसिद्ध असून पंचक्रोशीतील ग्रामस्थ याचा लाभ घेतात व तृप्त होतात.

सप्ताह यशस्वी होण्यासाठी लिलाधर शेठ महाले, अशोक फापाळे, रभाजी फापाळे, गुलाब महाले, प्रकाश फापाळे, दत्तात्रय महाले, सुरेश फापाळे, बाळासाहेब महाले, गिताराम फापाळे, पोपटराव फापाळे, पांडुरंग उकिरडे, विठ्ठलराव महाले, सतीष गाजरे, वैभव महाले, भगवान काळे, भाऊसाहेब कोकाटे,डाॅ. रावसाहेब महाले, महेश जगताप, बबनराव काळे, रमेश फापाळे, मेजर राजेंद्र डोंगरे, राहूल लांडे, लहूशेठ काळे, भाऊसाहेब महाले, निलेश फापाळे, बापु कुलकर्णी, रोहिदास फापाळे, अमृता फापाळे, गणेश फापाळे, सुरेश महाले, एम.के. फापाळे, विठ्ठल महाले, रोहिदास कोकाटे, दिलीपशेठ कोकाटे, सदाशिव गोपाळे, गंगाराम काळे, भारत शिरसाठ, राजाराम फापाळे, संजय कोकाटे, चंद्रकांत महाले, संदिपशेठ महाले, जालिंदर फापाळे, हौशिराम जाचक, सुदाम महाले, दादाभाऊ फापाळे, संजय उकिरडे, दशरथ फापाळे, भाऊसाहेब फापाळे, गोपीनाथ कोकाटे, शंकर काळे, विकास महाले, विलास खेबडे, भाऊसाहेब खेबडे, भाऊ फापाळे, उत्तम शिरसाठ, उत्तम कोकाटे, किसन फापाळे, लहू काळे, दादाभाऊ उकिरडे, सुरेश खेबडे, रमेश लांडे, दत्ता लांडे, बाबाजी उकिरडे, संभाजी काळे, दत्ता गवांदे, योगेश फापाळे, किशोर फापाळे, सुभाष महाले, किसन महाले, सुभाष तांबे, सुदाम महाले, दिपक फापाळे, काशिनाथ फापाळे, उत्तम फापाळे, सुनील फापाळे, प्रशांत फापाळे, डि.के. फापाळे, तुकाराम फापाळे, विकास फापाळे, रमेश लांडे, मारुती लांडे, गंगाराम खेबडे, सागर फापाळे, सुरेश महाले, भाऊराव गोपाळे, खंडू फापाळे, नाथा फापाळे, वसंत महाले, गोविंद फापाळे, आप्पाजी फापाळे, भागोजी महाले, उत्तम वाकचौरे, अजित फापाळे आदिंसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सहकार्य केले.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *