e07d65d7-fceb-4748-a3a9-f9fc2e115b4c

दिवंगत सुभाष खरबस हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते : मा. आमदार वैभव पिचड

दिवंगत सुभाष खरबस हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते : मा. आमदार वैभव पिचड

दिवंगत पत्रकार सुभाष खरबस यांच्या वर्षश्राद्धा निमीत्त व्यक्त केल्या भावना, अनेक मान्यवरांची होती उपस्थिती

राजेंद्र उकिरडे : सह्याद्री माझा

अकोले : कला, शैक्षणिक, पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रात दिवंगत सुभाष खरबस यांनी ठसा उमटवला होता. अजातशत्रू सुभाष खरबस हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या आपल्यातून जाण्याने तालुक्याची कला, शैक्षणिक, पत्रकारिता, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली असून कोरोनाने आपल्यातून अनेक चांगले चांगले लोक हिरावले आहेत. असे प्रतिपादन माजी आमदार वैभव पिचड यांनी केले.

श्री. पिचड अकोले येथे दिवंगत पत्रकार सुभाष खरबस यांच्या वर्षश्राद्धा निमीत्त आयोजित श्रद्धांजली सभेत बोलत होते. यावेळी श्री. खरबस यांच्या मित्र मंडळींनी दिलेल्या स्मृतीच्या उजाळ्यावर आधारित बहुआयामी या स्मृती ग्रंथाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ह.भ.प. दिपक महाराज देशमुख यांचे प्रवचन झाले.

लोकमत चे संपादक सुधीर लंके, अकोल्याच्या नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, काॅ. कारभारी उगले, सतीष नाईकवाडी, डाॅ. अजित नवले, मीनानाथ पांडे, कैलास वाकचौरे, काॅ. शांताराम वाळूंज, प्रा.बबनराव महाले, संजय कळमकर, अशोक आरोटे, जालिंदर वाकचौरे, विनय सावंत, सुरेश खांडगे, महेश नवले, विजय पोखरकर, सुनील गिते, डाॅ. सुनील शिंदे, डाॅ. उमा कुलकर्णी, अॅड. वसंत मनकर, राजेंद्र गोडसे, प्रा. विकास नवले, बाळासाहेब नाईकवाडी, भास्कर तळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. खरबस परिवारातील अंजनाबाई खरबस, गीतांजली खरबस, पत्रकार रमेश खरबस यांचे सांत्वन उपस्थितांनी केले.

ह.भ.प. दिपक महाराज देशमुख यांनी दिवंगत सुभाष खरबस यांच्या आठवणींना उजाळा दिला. लोकमत चे संपादक सुधीर लंके यांनी बहुआयामी पुस्तक प्रकाशना मागची भावना स्पष्ट केली. मित्र मंडळींनी दिलेल्या आठवणींचा ठेवा कायम जतन राहावा म्हणून बहुआयामी ही पुस्तकरुपी श्रद्धांजली कायमस्वरुपी राहणार असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी यावेळी व्यक्त केली. आभार ललित छल्लारे यांनी मानले.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *