IMG-20220508-WA0038

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली म्हाळादेवी येथील जलसेतू कामाची पाहणी

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली म्हाळादेवी येथील जलसेतू कामाची पाहणी
जलसेतू सह सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत प्रशासनाला दिल्या सूचना,  क्रेनच्या साह्याने अधिकाऱ्यांसमवेत जेलसेतूवर जाऊन नामदार थोरात यांनी ही पाहणी केली.
अमोल वैद्य : सह्याद्री माझा
अकोले (प्रतिनिधी) : दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यावरील मोठ्या जलसेतूच्या कामाच्या पहाणी   राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी  केली असून या जलसेतू सह सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथे उजव्या कालव्यावरील भव्य दिव्य जलसेतू (ॲक्वाडक्ट) ची पाहणी नामदार थोरात यांनी केली. यावेळी  जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड माधवराव कानवडे,  माजी अध्यक्ष सिताराम पा. गायकर, जि प सदस्य रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, ज्येष्ठ नेते  मीनानाथ पांडे , दादापाटील वाकचौरे,अशोकराव भांगरे, भास्करराव आरोटे, बाळासाहेब नाईकवाडी, नाशिकचे मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे,अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता प्रमोद माने यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
 यावेळी नामदार थोरात यांनी म्हाळादेवी येथील जलसेतू व उजव्या कालव्यावरील  रात्रंदिवस सुरू असलेली मशनरी, यंत्रणा याबाबतचा आढावा घेऊन त्यांच्या अडचणी समजावून घेत हे काम लवकरात लवकर होण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. तसेच या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या ही नामदार थोरात यांनी यावेळी समजावून घेतल्या.
 क्रेनच्या साह्याने अधिकाऱ्यांसमवेत जेलसेतूवर जाऊन नामदार थोरात यांनी ही पाहणी केली.
याबाबत निळवंडे धरणाच्या विश्रामगृहावर ही अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. या प्रसंगी बोलताना नामदार थोरात म्हणाले की, उजव्या व डाव्या दोन्ही कालव्यांची कामे रात्रंदिवस सुरू आहेत . येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबर च्या काळामध्ये दोन्ही कालव्यांना पाणी सोडता येईल याकरिता आपल्या सर्वांना काम करायचे आहे. अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनीही  या कालव्याच्या कामासाठी कायम सहकार्य केले आहे . शासन स्तरावर काही अडचणी असल्यास आपण ती प्राधान्याने सोडवू. दुष्काळी भागातील जनतेला लवकरात लवकर पाणी देणे  हा आपल्या जीवनाचा ध्यास आहे. याप्रसंगी शेतकऱ्यांच्या विविध अडचणी ही नामदार थोरात यांनी समजावून घेतल्या.
 यावेळी कार्यकारी अभियंता प्रमोद माने यांनी सुरू असलेल्या कामाची माहिती दिली
महसूल मंत्री ना.थोरात यांचे अकोले शहरात आगमन होताच शहरातील बुवासाहेब नवले पतसंस्था व मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी परिसरात  फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. याठिकाणी अभिनव शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते मधूकरराव नवले व कोषाध्यक्ष पदी युवा नेते विक्रम नवले यांची निवड झाल्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने ना.थोरात यांच्या हस्ते नवले पिता- पुत्रांचा सत्कार करण्यात आला.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *