मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या उपाध्यक्षपदी विष्णू पाडेकर
राष्ट्रीय अध्यक्ष विजयराव कदम यांनी केली निवड
अकोले : मराठा समाजासाठी तन-मन-धनाने सामाजिक कार्य करणारे धोत्रे येथील माजी सरपंच विष्णू पाडेकर यांची मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या कोपरगाव तालुका उपाध्यक्षपदी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयराव कदम यांनी नियुक्तीपत्र देऊन निवड केली भारत सरकार मान्यता प्राप्त मराठा समाज हित जोपासणारी एकमेव राष्ट्रीय संघटना म्हणून संघटनेची ओळख आहे.
आगामी काळात मराठा समाजाचे, शेतकरी बांधवांचे संघटन करून समाजासाठी पूर्णवेळ काम करून न्याय देण्याचा प्रयत्न करेन तसेच मराठा समाज मागे राहणार नाही नोकरी व्यवसायात मराठा समाजाने पुढे येण्याची गरज आहे मराठा बांधवांनी एकमेकांना सहकार्य करून समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार आहे असे प्रतिपादन विष्णू पाडेकर यांनी केले यावेळी किसान काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष दिलीपराव शिंदे, आदिनाथ सिनगर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन शिंदे , नामदेव चव्हाण, संजय चव्हाण, संजय त्रिभुवन, सुधाकर बागुल , लक्ष्मण टूपके, रंगनाथ चोपडे धोत्रे येथील ग्रामस्थ किसान काँग्रेसचे पदाधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Add a Comment