Untitled

बालकाचं शाळेतील पहिल्या पावलाचं मोठ्या उत्साहात स्वागत करा : शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद कुमावत

बालकाचं शाळेतील पहिल्या पावलाचं मोठ्या उत्साहात स्वागत करा : अरविंद कुमावत

कोतूळ बीट चे शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद कुमावत यांनी आबिटखिंड (ता. अकोले) येथे आयोजित केंद्रस्तरीय शाळापुर्व तयारी मेळाव्यात शिक्षकांना केले आवाहन, दोरी उड्या मारत घेतला प्रशिक्षणाचा आनंद

श्रीराज उकिरडे : राजेंद्र उकिरडे

अकोले : बालकाचं शाळेत पडणार पहिलं पाऊल त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारं असतं. शाळेत पहिलीला प्रवेश घेताना त्याचं उत्स्फुर्त स्वागत करा. त्या बालकांतूनच पुढची उज्ज्वल पिढी घडत असते. डाॅक्टर, इंजिनिअर, शिक्षक, कलेक्टर, शास्त्रज्ञ, खेळाडू, गायक, नेता, सामाजिक कार्यकर्ता हा या आलेल्या मुलांमधूनच घडत असतो. त्यामुळे शाळापुर्व तयारी मेळावे मोठ्या उत्साहात साजरे करा. असे आवाहन कोतूळचे शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद कुमावत यांनी केले.

श्री. कुमावत आबिटखिंड (ता. अकोले) येथे जांभळेवाडी केंद्र पातळीवरील आयोजित शाळापुर्व तयारी मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी केंद्रप्रमुख रामनाथ साबळे, दत्तात्रय भागवत, राजू मेहेर, सतिष बळे, मिना पडवळे, पोपट चौधरी, बाळू वायळ, भास्कर दिघे, अरुण वायळ, राहूल गोडे, रोहिदास धिंदळे, वैभव लाटणे, दिलीप गभाले, दिलीप आहेर यांच्यासह शिक्षक, अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अंगणवाडीतून पहिलीला प्रवेश घेणाऱ्या आबिटखिंड येथील विद्यार्थ्यांचे यावेळी स्वागत करण्यात आले. यावेळी माहितीपुर्ण ७ स्टाॅल लावण्यात आले होते.

श्री. कुमावत म्हणाले, शाळेत आलेल्या मुलाला हसू द्या, खेळू द्या, बागडू द्या, त्याच्या सुप्त गुणांची पारख करा. त्याच्यातील गुणांना चालना द्या. त्याला मुक्त वातावरण दिले तर तो शाळेत रमेल. त्यासाठी शिक्षकांनी अगोदरच नियोजन करुन शाळेमध्ये शाळापुर्व तयारी मेळावे घेऊन पालकांच्या सोबतीने बालकाचा सर्वांगिण विकास होईल त्या दृष्टीने प्रयत्न करावेत.

यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद कुमावत, यांनी प्रशिक्षणात सहभाग नोंदवत दोरी वरील उड्या मारत इतरांनाही प्रोत्साहित केले. त्यामुळे आज मोकळ्या वातावरणात आनंददायी प्रशिक्षण झाले. तज्ञ मार्गदर्शक म्हणून सोमनाथ मुठे व दादाभाऊ जोशी यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राजेंद्र उकिरडे यांनी केले. तर आभार रामनाथ साबळे यांनी मांडले.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *