पळसुंदे भैरवनाथ

पळसुंदे येथील भैरवनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पळसुंदे येथील भैरवनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान, नवसाला पावणारे दैवत म्हणून प्रसिद्ध

राजेंद्र उकिरडे : सह्याद्री माझा

कोतूळ, ता. १५ : राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान, नवसाला पावणारे दैवत म्हणून प्रसिद्ध असणारे पळसुंदे (ता. अकोले, जि. अहमदनग) येथील भैरवनाथाच्या दर्शनासाठी आज भाविकांनी गर्दी केली होती. भाविकांच्या गर्दीने भैरवनाथाचा डोंगर, घाटरस्ता फुलून गेला होता.

नगर, पुणे, नाशिक, मुंबई परिसरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या भैरवनाथाची यात्रा चैत्र शुक्ल त्रयोदशी आणि चतुर्दशीला भरते. या निमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असतात. त्रयोदशीला येणाऱ्या पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी लोकनाट्याचे आयोजन केले जाते. येथील भैरवनाथ हे जागृत देवस्थान असल्याने भाविक वर्षभर दर रविवारी या ठिकाणी भेट देत असतात. अशी माहिती माजी सरपंच पांडुरंग कचरे, कैलास राऊत यांनी दिली.

चतुदर्शीच्या दिवशी मोठी यात्रा या ठिकाणी भरत असते. दोन वर्ष कोरोना मुळे यात्रा भरली नसल्याने या वर्षी भाविक आपल्या कुटूंबासह आज या ठिकाणी भेट देताना दिसले. दुचाकी, चारचाकी वाहनांच्या गर्दीने परिसर फुलून गेला. होता.

आबिटखिंड येथील भैरवनाथ

त्याचप्रमाणे पळसुंद्याच्या भैरवनाथाचे दर्शन घेऊन येणार भाविक आबिटखिंड येथील भैरवनाथाचेही दर्शन घेत असल्याने या ठिकाणीही मोठी गर्दी होत असते. जागृत देवस्थानामुळे आबिटखिंड येथेही गर्दी होत असते. आबिटखिंड येथे यात्रेच्या निमीत्ताने भारुडाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 15.4.2022

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *