कविता : दैवात जे मिळे ते : कवयित्री : दिप्ती दिलीप यादव

विषय – खेळ प्राक्तनाचा…!

शीर्षक – दैवात जे मिळे ते

वृत्तबद्ध कविता

वृत्त – आनंदकंद

लगावली – गागालगा लगागा

हा खेळ प्राक्तनाचा आहे तुझा नि माझा

दैवात जे मिळे ते आहे तसे स्विकारा

जे जे असे नशीबी ते ते मिळेल तुजला

पैसा किती मिळाला नाही सुखास थारा ||१||

सकलांस दुःख आहे नाही सुखी कुणीही

वाट्यास दुःख आले आता भिती कशाची

मदतीस देव येतो श्रध्दा असे तरीही

माझेच दुःख मोठे समजूत ही मनाची ||२||

फासे सदा उलटती ठेवा मनी विचार

आयुष्य लाभले ते फुलवा फुलाप्रमाणे

माणूस जन्म आहे दुःखास तोंड द्यावे

नियतीस साथ देऊ राहू सदा सुखाने ||३||

गोष्टी समानतेच्या आहे तरी विषमता

श्रीमंत रोज खातो रोटी पहा तुपाशी

ना दैव साथ देते विश्वास ठाम आहे

दीनास घास नाही राही कधी उपाशी ||४||

नात्यात व्यर्थ होतो बाजार भावनांचा

कोणी सुखात राही कोणी मनास मारी

आनंद वाटताना नाती अतूट होती

कष्टात पोट भरतो त्यालाच देव तारी ||५||

कवयित्री : सौ. दीप्ती दिलीप यादव

मु.पो.आंबवली

ता.खेड जि.रत्नागिरी

9881846518

Comments are closed.