जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांची कळसेश्वर देवस्थानला भेट
कळस बु. (ता. अकोले) येथील सुभाष पुरी महाराज समाधीचेही घेतले दर्शन
राजेंद्र उकिरडे : सह्याद्री माझा
अकोले : अहमदनगर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संभाजी लांगोरे यांनी कळसेश्वर देवस्थान कळस बु येथील सुभाष पुरी महाराज समाधीचे दर्शन घेतले.
अकोले तालुक्यातील ब्रह्मलीन सुभाष पुरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या कळस बु. येथील कावड यात्रा नुकतीच संपन्न झाली या निमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी देवस्थान ला भेट दिली. सुभाष पुरी महाराज यांनी बुवा बाजी न करता वृक्षारोपण व संवर्धनासाठी कार्य केल्याचे त्यांनी कौतुक केले. त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्र विकास आराखडातुन भक्तनिवास, सभागृह, संरक्षक भिंत, सभामंडप यांची पाहणी केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणी केली. ग्रामस्थांचे वतीने चालविला जाणाऱ्या पूर्व प्राथमिक वर्गांना भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. जिल्हा परिषदेच्या शाळेत हा उपक्रम सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
कळस चे माजी सरपंच भाऊसाहेब वाकचौरे यांनी जिल्हा परिषद सदस्य कैलासराव वाकचौरे यांच्या मार्गदर्शना खाली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास आराखडा यातून देवस्थान वर व गावात सुरू असणाऱ्या विकास कामांची माहिती दिली. सोसायटी चेअरमन विनय वाकचौरे, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य ज्ञानदेव निसाळ, प्रकाश बिबवे, पांडुरंग वाकचौरे, रामदास वाकचौरे, सुरेश वाकचौरे, रावसाहेब गोरे यांनी शैक्षणिक समस्या मांडल्या.
कळसेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्त सीताराम वाकचौरे व सचिव गोपीनाथ ढगे यांच्या तर जिल्हा परिषद शाळेत सोन्याबापू वाकचौरे व सरपंच राजेंद्र गवांदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा शिक्षण अधिकारी भास्कर पाटील, अकोलेचे शिक्षण अधिकारी अरविंद कुमावत, संगमनेर साखर कारखान्याचे संचालक संभाजी वाकचौरे, डी टि वाकचौरे, उपसरपंच ज्ञानेश्वर वाकचौरे, सोसायटी चे संचालक प्रकाश आल्हाट उपस्थित होते.
Add a Comment