गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी एकत्रितपणे काम करावे : लीलावती सरोदे
लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिर येथे आयोजित शाळापूर्व तयारी मेळाव्यात सरोदे बोलत होत्या.
राजेंद्र उकिरडे : सह्याद्री माझा
राहाता : गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पालक शिक्षक आणि विद्यार्थी आणि एकत्रितपणे काम करावे जोपर्यंत हा त्रिकोण तयार होत नाही तोपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार नाही. प्रवरेचा माध्यमातून आदर्श विद्यार्थी घडवण्याचे काम होत आहे. शाळेतील शिक्षणामुळे शिक्षणाला जिवंतपणा येतो यासाठी शाळा पूर्वतयारी मिळावा महत्त्वपूर्ण आहे असे प्रतिपादन डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शिक्षण संचालक लीलावती सरोदे यांनी केले.
लोणीचा प्रवरा कन्या विद्या मंदिर येथे आयोजित शाळापूर्व तयारी मेळाव्यात सरोदे बोलत होत्या. यावेळी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुस्मिता विखे-पाटील, राहाता पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे, केंद्रप्रमुख संभाजी पवार, प्राचार्य दिप्ती आडेप आणि मुख्याध्यापिका सीमा बडे यांच्यासह विद्यार्थी पालक उपस्थित होते.
हसत खेळत शिक्षण देत असताना कोवीड काळात माजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन बरोबरच वस्तीशाळा हा उपक्रम यशस्वी ठरला व प्रवरेच्या सर्व प्राथमिक शाळेत पूर्वतयारी मेळावा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बदलते शिक्षण पद्धती आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे या मेळाव्यास विशेष महत्त्व आले आहे असे गटशिक्षण अधिकारी राजेश पावसे यांनी सांगून मराठी संवाद साधत आणि विविध कलाकृती यांच्या शिक्षण आनंदी कसे होईल यासाठी पालकांचा सहभाग महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.
सुस्मिता विखे पाटील यांनी यानिमित्ताने विकास भाषा विकास सामाजिक व भावनात्मक विकास पूर्वतयारी याबाबत संवाद साधत या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी पवार यांनी करताना या कार्यक्रमाचा हेतू विशद केला सूत्रसंचालन वैशाली जाधव यांनी तर आभार दिपाली राहणे यांनी मानले. 18.4.2022
Add a Comment