खवटी (ता. अकोले) येथील प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थी आपुलकी मेळावा उत्साहात
मुख्याध्यापक वैभव लाटणे यांनी केले मदतीचे आवाहन
राजेंद्र उकिरडे : सह्याद्री माझा
जांभळेवाडी : केंद्रातील खवटी (ता. अकोले) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गटशिक्षण अधिकारी अरविंद कुमावत, केंद्रप्रमुख रामनाथ साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थ्यांच्या आपुलकी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती मुख्याध्यापक वैभव लाटणे यांनी दिली.
यावेळी शाळेत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती श्री. लाटणे यांनी उपस्थितांना दिली. व शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी व पालकांनी मदत करावी असे आवाहन केले. यावेळी अनिल धावजी मुठे (शा. व्य. समिती अध्यक्ष), रवींद्र पुनाजी मुठे (ग्राम पंचायत सदस्य), मुठे आबा लहू, श्री.साळवे संतोष कोंडीराम (शा.व्य.समिती शिक्षण तज्ञ), माजी विद्यार्थी मधुकर साळवे, अनिल काशिनाथ मुठे, स्वप्नील दत्तू मुठे, नितीन कोंडीराम साळवे आदी मेळाव्यास उपस्थित होते.
Add a Comment