आबिटखिंड येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
भैरवनाथ सेवा मंडळ मुंबई आणि शांती फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय साहित्याचे वाटप
आबिटखिंड, ता. अकोले : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आबिटखिंड, वाजेवाडी, भोजनेवाडी व सर्वोदय विद्यामंदिर आबिटखिंड यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती भैरवनाथ सेवा मंडळ मुंबईचे अध्यक्ष रामनाथ भोजने यांंनी दिली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त स्वातंत्र्यदिनी १७० विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटप करण्यात आले. दरवर्षी भैरवनाथ सेवा मंडळ मुंबई आणि शांती फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने विविध ठिकाणी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येत असून त्यामुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो. यावेळी ह.भ.प. किसन महाराज घनकुटे, ग्रामसेवक सुकटे भाऊसाहेब, सर्वादय चे मुख्याध्यापक डी.डी फापाळे, राजेंद्र उकिरडे, मेजर भानुदास गोडे, भरत घनकुटे, सुधाकर गोडे, मधुकर जगधने, लक्ष्मण जगधने, संजय शिंदे, निवृत्ती गोडे, सुनिल शिंदे, किसन गोडे, वसंत घनकुटे, सोमनाथ मुठे, रंगनाथ हुलवळे, संतोष साबळे, माधव कचरे, श्री. कडू, जयश्री उकिरडे, संजया देशमुख मॅडम, दत्ता फुलसुंदर, भिमराव आरोटे, तुकाराम औचिते, संतोष हुलवळे, दत्ता मुठे, रोशन घनकुटे, अनिल भोजने, निवृत्ती औचिते, रोशन घनकुटे, लोकपंचायतच्या कोटकर मॅडम, आरोग्य विभागाच्या बांबळे सिस्टर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
पुढील काळात शैक्षणिक सुविधा अधिक मिळण्यासाठी भैरवनाथ सेवा मंडळ मुंबई च्या माध्यमातून अधिक प्रयत्न केले जातील अशी माहिती उपाध्यक्ष भानुदास घनकुटे यांनी दिली.
Add a Comment