आई वडिल हे मोठे दैवत : समाधान महाराज भोजेकर
कै.गं.भा.सावित्रीबाईं रामचंद्र गायकवाड आणि कै.सौ.मंजुळा ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमात किर्तन सेवेत भोजेकर महाराज यांचे प्रतिपादन, परिवाराच्या वतीने उपस्थितांना सोनचाफ्याचे रोप भेट, तर दुखवट्यांना दिला फाटा.
राजेंद्र उकिरडे : सह्याद्री माझा
नाशिक : आई वडिल हे मोठे दैवत असून त्यांची काळजी घेतली तर सर्व तिर्थाचे पुण्य तुम्हाला मिळेल. असे प्रतिपादन “झी चोवीस तास मन मंदिरा गजर भक्तिचा” फेम समाधान महाराज भोजेकर यांनी केले.
भोजेकर महाराज नाशिक येथे कै.गं.भा.सावित्रीबाईं रामचंद्र गायकवाड आणि कै.सौ.मंजुळा ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या वर्षश्राद्ध कार्यक्रम प्रसंगी आयोजित किर्तनात उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी ज्ञानेश्वर रामचंद्र गायकवाड, वामन रामचंद्र गायकवाड, बाळू रामचंद्र गायकवाड, सौ.रोहिणी हरिभाऊ जोर्वेकर, समाधान गायकवाड, धिरज गायकवाड, प्रफुल्ल गायकवाड यांच्यासह पाहुणे, मित्रमंडळ उपस्थित होते.
श्री. भोजेकर महाराज यांनी यावेळी आई वडिल आपल्या मुलांना किती कष्टातून मोठे करतात त्यांना योग्य मार्गावर लावतात. मात्र अनेक मुले त्याची जाण न ठेवता त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात हे चित्र बदलले पाहिजे, पैसा येतो जातो मात्र आई वडिलांचे पांग फेडणारी मुलेच जीवनात यशस्वी झाल्याचे आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.
वर्षश्राद्धाच्या निमीत्ताने गायकवाड परिवाराची मुलगी सौ.रोहिणी हरिभाऊ जोर्वेकर यांनी उपस्थितांना 200 सोन चाफ्याचे रोप भेट देत आपल्या आई आणि भावजई यांच्या स्मृतींना अभिवादन केले. तर कोणत्याही प्रकारचे दुखवटे न घेता एक वेगळा पायंडा गायकवाड परिवाराने समाजापुढे ठेवत आदर्श निर्माण केला. 17.4.2022
Superb