अकोल्याचे गटशिक्षण अधिकारी अरविंद कुमावत यांची अहमदनगर जिल्हा सहाय्यक आयुक्त (स्काऊट) पदी नियुक्ती
राजेंद्र उकिरडे : सह्याद्री माझा
अकोले, ता. १८ : अकोल्याचे गटशिक्षण अधिकारी अरविंद कुमावत यांची अहमदनगर जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त (स्काऊट) पदावर नियुक्ती झाली असून त्याबद्दल शिक्षण विभागातील कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
श्री. कुमावत यांनी गटशिक्षण अधिकारी म्हणून एक वेगळा ठसा निर्माण केला असून. तालुक्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. श्री. कुमावत आपल्या सहायक जिल्हा आयुक्त (स्काऊट) या पदाच्या कार्यकालात विविध उपक्रम निश्चित राबवणार असल्याने. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. ही निवड आॅक्टोबर २०२२ पर्यत असल्याचे श्री. कुमावत यांनी सांगितले.
निवड झाल्याबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी बबन निघुते, सविता कचरे, यांनी श्री. कुमावत यांचा सत्कार केला. यावेळी संतोष देशमुख, कैलास झोळेकर, केशव भांगरे,प्रवीण चव्हाण, राहुल देशमुख, नितीन चोथवे, शिक्षक नेते गोरक्ष देशमुख, सीमा कानवडे, बाजीराव गंभिरे, चंद्रकांत केदार, सय्यद यांच्यासह शिक्षण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
Add a Comment