अकोले विधानसभा मतदारसंघातील २ हजार ३९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण

अकोले विधानसभा मतदारसंघातील २ हजार ३९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण

निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या उपस्थितीत झाले प्रशिक्षण

शिर्डी, दि.२७ – अकोले विधानसभा मतदारसंघातील २ हजार ३९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या उपस्थितीत निवडणूक विषयक प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी प्राधान्याने करावयाच्या अनिवार्य बाबी, ईव्हीएमची वाहतूक, मतदान केद्रांची रचना, केंद्रावरील सुरक्षाव्यवस्था, मतदान यंत्रे हाताळणीबाबत असलेल्या तांत्रिक बाबी, मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया पार पाडत असताना सर्व यंत्रे सुरळीतपणे कार्यान्वित आहेत किंवा नाही याची खातरजमा करणे आदी विषयांबाबत माहिती देण्यात आली. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी करावयाची कार्यवाही, मतदान प्रकिया सुरू होण्यापूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर प्रत्यक्ष मतदानाआधी अभिरूप मतदान घेणे, अभिरूप मतदान प्रकियेच्या सुरुवातीपासून ते प्रक्रिया संपन्न होईपर्यंतच्या कामकाजाविषयीदेखील मार्गदर्शन करण्यात आले.

निवडणूक प्रक्रियेत मतदान हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. हा टप्पा अधिक बिनचूक व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. निवडणूक यंत्रणेतील विविध घटकांना या प्रशिक्षणामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व बिनचूक पार पाडण्यासाठी फायदा होईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांनी सांगितले.

प्रशिक्षण सत्र यशस्वितेसाठी निवासी नायब तहसीलदार किसान लोहारे, महसूल नायब तहसीलदार प्रमोद सावंत, निवडणूक नायब तहसीलदार दत्तू वाघ, नायब तहसीलदार मार्तंड माळवे तसेच उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयातील अधिकारी – कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *