पर्यावरण हा जगण्याचा भाग : प्रमोद मोरे

पर्यावरण हा जगण्याचा भाग : प्रमोद मोरे

अहिल्यानगर सावेडी येथे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाच्या सभेत पर्यावरण विषयक स्पर्धा आणि कार्यालय सुरू करण्याचा ठराव संमत

श्रीरामपूर : वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन पर्यावरणाच्या समतोलासाठी आवश्यक असून पर्यावरण हा सर्वांच्या जीवनाचा आणि जगण्याचा भाग आहे, असे प्रतिपादन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी व्यक्त केले.

अहिल्यानगर सावेडी येथील सिद्धिविनायक मंदिरात नुकतीच निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाची सभा कार्याध्यक्ष छायाताई राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर, अध्यक्ष प्रमोद मोरे, सचिव वनश्री मोरे-गुणवरे, सचिव डॉ. अनिल लोखंडे, सरपंच बाळासाहेब ढोले यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्वप्रथम सिद्धिविनायकास पुष्प वाहून वंदन करण्यात आले.

सभेचे प्रास्ताविक व स्वागत राज्य संघटक डॉ. शरद दुधाट यांनी केले. याप्रसंगी मंडळातील पदाधिकारी यांची वेगवेगळ्या निवडीबद्दल व विशेष प्राविण्याबद्दल डॉ. अनिल लोखंडे, डॉ. शरद दुधाट, संतोष परदेशी, चंद्रकांत भोजने, वर्षाताई घुले, उत्तम पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी आंबीखालसाचे सरपंच बाळासाहेब ढोले, कार्याध्यक्ष संतोष परदेशी, जिल्हाध्यक्ष लतिका पवार, सचिव डॉ. अनिल लोखंडे, जिल्हाध्यक्ष तुकाराम आडसूळ, अर्जुन राऊत, महादेव लांडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी सजीवांच्या अस्तित्वासाठी प्राणवायू खूप मोलाचा असून पर्यावरण आणि वृक्षांचे संवर्धन ही काळाची गरज आहे. तसेच प्रमोद मोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मंडळाच्या यशस्वी वाटचालीबद्दल त्यांनी कौतुक केले.

प्रमोद मोरे यांनी सभेतील विविध विषयांचे सविस्तर विवेचन केले तर अध्यक्षा छायाताई राजपूत यांनी मंडळाच्या तालुक्यानुसार शाखा सुरू कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रसंगी डॉ. प्रवीण गुणवरे, राज्य प्रसिद्धी प्रमुख महेश पाडेकर,बाळासाहेब गाडेकर, अशोक भोसले, प्रकाश केदारी, राजेश परदेशी, मोहन खवळे, आशा कांबळे, मदन राजपूत, पद्मा राजपूत, राजेंद्र आहेर, राजश्री आहेर, चंद्रकांत भोजने, बाळासाहेब बोडखे यांच्यासह पर्यावरण मंडळातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या आयोजनासाठी जिल्हाध्यक्ष लतिका पवार व अवधूत पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार कार्याध्यक्ष संतोष परदेशी यांनी मानले.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *