padekar

दिवाळीपूर्वी प्रलंबित मेडिकल व थकित बिले मंजूर करावी – महेश पाडेकर

दिवाळीपूर्वी प्रलंबित मेडिकल व थकित बिले मंजूर करावी – महेश पाडेकर

शिक्षक भारती संघटनेचे माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस व वेतन अधिक्षक रामदास म्हस्के यांना निवेदन

अहिल्यानगर: जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची गेल्या दोन ते तीन वर्षापासून प्रलंबित असणारे मेडिकल बिले व थकीत बिले दिवाळीपूर्वी अदा करावी अशी मागणी माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस व वेतन अधिक्षक रामदास म्हस्के यांना शिक्षक भारती संघटनेचे निवेदन देण्यात आले अशी माहिती शिक्षक भारती संघटनेचे सरचिटणीस महेश पाडेकर यांनी दिली.

गेल्या अनेक दिवसापासून कोरोना कालखंडातील कोरोना आजाराची मेडिकल बिले व थकीत फरक बिले अद्याप मंजूर झालेले नाही अधिकाऱ्यांना विचारले असता निधी नाही असे कारण सांगितले जाते त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी प्रलंबित मेडिकल व थकीत दिले मंजूर करून कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी शिक्षक भारती संघटना अहमदनगर यांनी केली आहे.

राज्य सचिव सुनील गाडगे,जिल्हाध्यक्ष रामराव काळे, सरचिटणीस महेश पाडेकर, महिला जिल्हाध्यक्षा रूपाली कुरुमकर, जिल्हा उपाध्यक्ष सचिन जासूद,दादासाहेब कदम, कोषाध्यक्ष गोपाळ दराडे, प्रसिद्धीप्रमुख अमोल चंदनशिवे ,तालुका अध्यक्ष संजय सुमंत शिंदे, नरेंद्र लहिरे, संजय भालेराव, नानासाहेब खराडे, रूपालीताई बोरुडे, मफीज इनामदार,कल्पना चौधरी, अकील फकीर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *