2

संपूर्ण राज्यभर पर्यावरण मंडळाच्या शाखा उभारणार- प्रमोद मोरे

संपूर्ण राज्यभर पर्यावरण मंडळाच्या शाखा उभारणार- प्रमोद मोरे

पर्यावरण मंडळाचे महाराष्ट्रातील पहिल्या शाखेचे उद्घाटन आबिटखिंड येथे संपन्न

आबिटखिंड ता. अकोले : महाराष्ट्राचे काश्मीर समजल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील आबिटखिंड येथे सह्याद्रीच्या कुशीत निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली, मुंबई विभाग, श्री भैरवनाथ सेवा मंडळ अबिटखिंड (नोकरदारवर्ग ग्रामिण आणि मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्रीच्या डोंगर रांगेत आबिटखिंड येथे जिल्हास्तरीय पर्यावरण स्नेही मेळावा व गुणवंत विद्यार्थी,शेतकरी गुणगौरव सोहळा संपन्न झाला.

याप्रसंगी जिल्ह्यातील अनेक पर्यावरण स्नेही यांनी ५०० झाडांचे वृक्षारोपण करून तेथे ट्री गार्ड लावून लोकार्पण केले, तसेच निसर्गाची जपणूक फक्त डोंगराळ आदिवासी भागातील लोकच करू शकतात त्यांच्यात जनजागृती करण्यासाठी भव्य रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या महाराष्ट्रातील पहिल्या शाखेचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे, सचिव वनश्री मोरे-गुणवरे, राज्य प्रसिद्धी प्रमुख महेश पाडेकर, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष रामनाथ भोजने यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रभर पर्यावरण मंडळाची स्थापना करून पर्यावरण जनजागृती करणार असे प्रतिपादन अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी केले.

यावेळी आदिवासी सेवा संघाच्या वतीने सह्याद्री भूषण पुरस्कार देखील सचिव वनश्रीताई मोरे-गुणवरे, रामेश्वर चेमटे, राजश्री आहेर, बाळासाहेब ढोले, राम वाकचौरे यांना देऊन सत्कार करण्यात आला. आदिवासी भागातील गुणवंत विद्यार्थी व शेतकरी यांचा देखील सन्मान करण्यात आला याप्रसंगी प्रमोद मोरे, रामनाथ भोजने, चंद्रकांत भोजने, महेश पाडेकर, अनिल लोखंडे, विजय बोडके, छाया रजपूत, तुकाराम अडसूळ, प्रवीण गुणवरे, प्रकाश केदारी, सुनील घुले, संजय कारखिले, सुधाकर शेटे, सखाराम मेसे, कोंडीराम नेहे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष रामनाथ भोजने, सरपंच यमुनाताई घनकुटे, मुख्याध्यापक राजेंद्र उकिरडे, दशरथ फापाळे, गोविंद घनकुटे, भानुदास गोडे, विजय घनकुटे, मुरलीधर गोडे, दत्तात्रय घनकुटे, दीपक राऊत आदींनी परिश्रम घेतले.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *