आबिटखिंड येथे शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
मुंबई येथील उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या कडून सॅंडल, वह्या, दप्तर, शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
आबिटखिंड (ता. अकोले) : येथील सर्वोदय विद्यामंदिर आबिटखिंड, त्याच प्रमाणे वाजेवाडी, भोजनेवाडी, आबिटखिंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यासाठी मुंबई चे समाजसेवक दिनेश परमार, उद्योजक भाजनलाल रोहरा, अध्यक्ष शांती फाउंडशन मुंबई चे सुरेश भाई मेहता, एल.आयसी च्या जयश्रीताई चौधरी यांनी हे साहित्य वाटले. जवळपास दोनशे विद्यार्थ्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थांना वह्या, दप्तर, पेन्सिल किट आणि सॅंडल अशा वेगवेगळ्या वस्तू देण्यात आल्या. याकामी रामनाथ भोजने (अध्यक्ष भैरवनाथ सेवा मंडळ मुंबई अबितखिंड नोकर स्टाफ कमिटी) भाऊसाहेब जगधने (उपसचिव भैरनाथ सेवा मंडळ मुंबई अबितखिंड नोकर स्टाफ कमिटी) यांचे सहकार्य लाभले.
यावेळी सरपंच सौ.यमुनाबाई घनकुटे, उपसरपंच ओंकार भारमल, ग्रामसेवक सुकटे भाऊसाहेब, माजी सरपंच भानुदास गोडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर जगधने, रामनाथ भोजने (ग्रामपंचायत सदस्य), सुधाकर गोडे (खजिनदार भैरवनाथ सेवा मंडळ मुंबई), सीताराम राऊत, डी.डी. फापाळे, राजेंद्र उकिरडे, भास्कर दिघे, बाळू वायळ, विकास भागीत, सोमनाथ मुठे, किसन घनकुटे, किसन गोडे, सुनील शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Add a Comment