मुलांचे वाढते वय व त्यांचा आहार : लेख : संगिता बांबळे

संगिता बांबळे
अकोले : आजच्या मुलांच्या आहाराबाबत व काही आजारा बाबत ज्यावेळी त्यांची आई शाळेत तक्रार करते. तेव्हा समजते कि मुलाच्या आहारामुळेच त्यांच्या खूप तक्रारी वाढत आहेत. कारण त्याचे खाण्याचे लाड घरापासूनच सुरु होतात त्याचा हट्ट पुरविले जातात व त्यामुळे पौष्टिक खाण्याकडे मुले दुर्लक्ष करतात. मुलाच्या डब्यात पोळी भाजी एवजी आपणच बिस्कीट, पिझ्झा, वडापाव असे पदार्थ देतो तसेच पाहिजे तेवढे चॉकलेट देऊन त्यांचे दातदुखी , पोटदुखी, चक्कर येणे असे आजार मुलांमध्ये बळावत आहेत . संतुलित आहार न घेतल्यामुळे त्याच्या वाढीवर परिणाम होत आहे. मोबाईल च्या वापरामुळे डोळ्यांना चष्मा लागणे ,लठ्ठपणा असे विकार वाढू लागले आहेत मग मुलाच्या मातामुलाच्या आहाराबाबत शाळेत तक्रार करतात जर बालकाना व्यवस्थित आहार दिला तर नक्कीच त्याची तब्येत सुधारू शकते .
पूर्वी आपल्याला कुठे बिस्कीट, केक मिळत होते तरीही आपल्या तब्येती व्यवस्थित होत्या. कारण आपण गुळाचा काला, राजगिरा लाडू , शेंगदाना लाडू असे पोष्टिक पदार्थ खायचो. आजीच्या हातचे लाडू खातानी मज्जाच रहायची तोच आहार जर बालकांना दिला तर त्याचा नक्कीच शारीरिक व मानसिक विकास होईल यासाठी प्रत्येक आईने संतुलीत आहार आपल्या बालकाला कसा मिळेल याबाबत दक्षता घेतली पाहिजे पूर्वी लाडू, चिवडा, शंकरपाळे यांचे डबे भरलेले असायचे पण आता फास्टफूड मुले जस वडापाव , भेळ, केक, पिझ्झा बर्गर यामुळे मुलाकडे दुर्लक्ष होत आहे तेव्हा सावधान कमी वयात होणारे आजार होऊ नयेत म्हणून विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार द्या व तंदुरुस्त ठेवा.
संकलन- संगीता वाळू बांबळे
शाळा- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगरी,
ता. अकोले, जि. – अहमदनगर
Add a Comment