परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या प्रेरणेमुळे सामाजिक कार्यात सक्रिय : हेमलताताई पिचड
अकोले तालुका पत्रकार संघाने “अकोले गौरव” पुरस्कार देऊन केला सन्मान
राजेंद्र उकिरडे : सह्याद्री माझा
राजूर : निसर्ग जगला तर माणूस जगेल आणि त्यासाठी प्रत्येकाने झाडे लावून त्यांच संरक्षण केले पाहिजे. यासाठी माझा झाडे लावण्यावर अधिक भर असून सामाजिक कार्याची आवड दिवंगत परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्यामुळे निर्माण झाली. असे प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या सौभाग्यवती हेमलताताई पिचड यांनी केले.
सौ. पिचड यांचा अकोले तालुका पत्रकार संघाचे वतीने पत्रकार दिनी जाहिर झालेला “अकोले गौरव” हा पुरस्कार प्रकृती अस्वास्थामुळे नुकताच सौ. पिचड यांच्या घरी जाऊन सन्मान करण्यात आला त्यावेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. यावेळी अकोले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील गिते, जेष्ठ पत्रकार शांताराम काळे, पत्रकार संजय उकिरडे, गोकूळ कानकाटे, प्रकाश महाले, विलास तुपे, राजेश टिभे, राजेंद्र उकिरडे यांच्यासह पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.
सौ. पिचड म्हणाल्या, आगामी काळात महिला सक्षमीकरण, वनीकरण, आरोग्य आदि बाबींवर मी लक्ष देणार आहे. यासाठी महिलांना बरोबर घेऊन काम करणार आहे. आजच्या वाढत्या तापमानावर मात करायची असेल तर वृक्षारोपण अधिक प्रमाणावर झाले पाहिजे. आणि ते टिकलवे पाहिजे. ही आगामी काळाची गरज आज आपण ओळखली पाहिजे. पत्रकार संघाने माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे.
अकोले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील गिते, जेष्ठ पत्रकार शांताराम काळे, प्रकाश महाले, राजेंद्र उकिरडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. आभार गोकूळ कानकाटे यांनी मानले.
Add a Comment