निगडी येथील घोडके सराफ अँड ज्वेलर्स मध्ये चैत्र गौरी हळदी कुंकवाचे आयोजन
पारंपरिक कलाकुसरीचे दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहेत घोडके सराफ
संजय उकिरडे : सह्याद्री माझा
निगडी : निगडी येथील घोडके सराफ अँड ज्वेलर्स मध्ये चैत्र गौरी हळदी कुंकवाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. घोडके सराफ हे पारंपरिक कलाकुसरीचे दागिन्यांमुळे प्रसिद्ध आहे. यात पारंपरिक ठुशी, साज, पुतळ्या, आणि आधुनिक टेंपल चे दागिने येथे मिळत असल्याने दुकानात महिलांची वर्दळ असते. खात्रीशीर दागिण्यांसाठी घोडके सराफ प्रसिद्ध आहेत.
चैत्र महिन्यात मराठी स्त्रियांकडून साजरा करण्यात येणार सोहळा म्हणजे चैत्र गौरी पूजन होय. महाराष्ट्रात चैत्र शुक्ल तृतीये पासून चैत्रगौर बसविली जाते. देवीला झोपाळ्यात बसवून महिनाभर म्हणजे वैशाख शुक्ल तृतीया अर्थात अक्षय्य तृतीयेपर्यंत गौरीची पूजा केली जाते. घरातील स्त्रिया हळदी कुंकू करून चैत्रगौरी पुढे शोभिवंत आरास मांडतात. या महिन्यात गौरी आपल्या माहेरी येते अशी कल्पना आहे. गौरीची आरती करतांना काही ठिकाणी ‘गौरीचे माहेर’ हे विशिष्ट गाणे म्हटले जाते. असा हा पारंपरिक सण घोडके सराफ अँड ज्वेलर्स निगडी साजरा करण्यात आला. याप्रसंगी गीता घोडके, माजी उपमहापौर शैलजा मोरे, प्रिया बनसोडे, माजी उपहापौर यांच्या पत्नी अपर्णा मिसाळ आदी महिला उपस्थित होत्या.
Add a Comment