मुक्ताईवाडी (ता. अकोले) चे बाळासाहेब श्रीरंग आरोटे हे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
औरंगाबाद येथील प्रगती बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय दिला पुरस्कार, उपक्रमशील शिक्षक म्हणून श्री. आरोटे आहेत परिचित
राजेंद्र उकिरडे : सह्याद्री माझा

बाळासाहेब आरोटे
ब्राम्हणवाडा (ता. अकोले) : येथील जि.प.प्राथ.शाळा, मुक्ताईची वाडी येथील उपक्रमशील शिक्षक बाळासाहेब श्रीरंग आरोटे सर यांना औरंगाबाद येथील प्रगती बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने (सन २०२१-२२) सन्मानित करण्यात आले.
बाळासाहेब आरोटे हे सध्या जि.प. शाळा, मुक्ताईची वाडी येथे कार्यरत असून त्यांनी गेली चार वर्षे शाळेत विविध उपक्रम राबविले आहेत. तसेच कोरोना काळातही विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू ठेवले. याकाळात स्वतः बनवलेल्या अभ्यास कार्डांचे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन वाटप केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
औरंगाबाद येथील मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी सभागृहात आयोजित कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष रोहित गिरी, सचिव श्वेता गिरी, बसवराज मंगलाढे प्रदेश उपाध्यक्ष भाजपा, बापू घडामोडे माजी महापौर तथा सरचिटणीस ओबीसी मोर्चा, माजी मंत्री आ. अतुल सावे, श्रीमती जयश्री चव्हाण, प्रा. वाघ पी.ए.जैन इंटरनॅशनल स्कूलचे सचिव जितेंद्र छाजेड, निलेश त्रिभुवन, राजीव वाघ, श्रीमती गीता कापुरे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब आरोटे सरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार मिळाल्या बद्दल ब्राह्मणवाडा गावचे सरपंच, उपसरपंच, व ग्रामस्थ तसेच अकोले पं.स. गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, ब्राह्मणवाडा बीटचे विस्तार अधिकारी राजेश पावसे, ब्राह्मणवाडा केंद्राचे केंद्रप्रमुख फंड आदींनी श्री. आरोटे यांचे अभिनंदन केले आहे.
Add a Comment