WhatsApp Image 2022-04-27 at 6.24.08 PM

कोतूळ (ता. अकोले) येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी सोहळा उत्साहात साजरा

कोतूळ (ता. अकोले) येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी सोहळा उत्साहात साजरा

मुंबई उच्च न्यायालयाचे अ‍ॅड. संघराज रुपवते, राज्य महिला आयोग सदस्या उत्कर्षा रुपवते, साहित्यिक प्रा. किसन चव्हाण, भाऊदाजी पाटील प्रतिष्ठानचे रविंद्र देशमुख आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा.

राजेंद्र उकिरडे : सह्याद्री माझा

कोतूळ (ता. अकोले) : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर फक्त एका समूहा पुरतेच मर्यादित नाहीत तर त्यांच्या विचारांना मानणारे जगभरात आहेत. त्यांच्या विचारांमुळे समाजातील प्रत्येक घटकाला जीवन जगणे सुकर झाले. असे प्रतिपादन प्रा. किसन चव्हाण यांनी केले.

कोतूळ (ता. अकोले) येथे डाॅ बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी सोहळा कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. याप्रसंगी युवा कार्यकर्ते राजेंद्र देशमुख, सरपंच भास्कर लोहकरे, उपसरपंच संजय देशमुख, प्रा. अजय पवार, सुरेशराव देठे, मच्छिंद्र बर्वे, राजेंद्र गवांदे, गवनेर सरोदे, सुरेशराव जगधने, प्रकाश डोळस, दिनकर बर्वे, प्रा अजय पवार, शेंगाळ मॅडम, विनोद देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डाॅ, बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. उपस्थित मान्यवरांना भारताचे संविधानाच्या प्रतिंचे भेट म्हणून वाटप करण्यात आले.

मुंबई उच्च न्यायालयाचे अ‍ॅड. संघराज रुपवते यांनी यावेळी आपल्या खुमासदार शैलीत समाजाने एकत्र राहणे किती गरजेचे आहे याचे महत्व विषद केले.

राज्य महिला आयोग सदस्या उत्कर्षा रुपवते, भाऊदाजी पाटील प्रतिष्ठानचे रविंद्र देशमुख, सामाजिक कार्यकर्ते विजयराव वाकचौरे, मृणाल साळवे, दिक्षा देठे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नामदेव बर्वे सर, नवनाथ वैराळ सर, गणेश साळवे, गौतम रोकडे, प्रविण साळवे, जेजेराम वैराळ, प्रशिक सोनवने, अविनाश गायकवाड, माधव कांबळे, रामदास साळुंखे, गौतम शिंदे, भद्रीके, भाविक खरात यांनी प्रयत्न केले. प्रास्ताविक पोपटराव सोनवणे, सुत्रसंचालन संदिप बर्वे, गणेश साळवे यांनी केले. तर आभार पदस्पर्श सोहळा कृती समिती अध्यक्ष एन.डी. बर्वे यांनी मानले. राज्य महिला आयोग सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी भारताचे संविधान उद्देशिकेचे शेवटी वाचन करत कार्यक्रमाचा समारोप केला. 27.4.2022

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *