कलाशिक्षक सुभाष चारूडे यांना राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार प्रदान
औरंगाबाद येथे प्रगती बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने दिला पुरस्कार
संजय उकिरडे : सह्याद्री माझा
करजगाव : येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील कलाशिक्षक सुभाष चारूडे यांना औरंगाबाद येथे प्रगती बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने मराठवाडा प्रशिक्षण महसुल प्रबोधनी, जालना रोड, औरंगाबाद या सभागृहात नुकताच भव्य समारंभात राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे. आमदार अतुलजी सावे तसेच राष्ट्राध्यक्ष कोचिंग क्लासेस असोसिएशनचे प्रा.वाघ पी. ए., जैन इंटरनॅशनल स्कूलचे सचिव जितेंद्रजी छाजेड, निलेश त्रिभुवन, राजीव विनायकराव वाघ जिल्हा अध्यक्ष भाजपा शिक्षण संस्थाचालक, श्रीमती गीता कापुरे अध्यक्ष गीता फाउंडेशन, संस्थेचे अध्यक्ष रोहित गिरी तसेच सचिव श्वेता गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला.
सुभाष चारूडे यांच्या कलाक्षेत्रातील विविध कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांना या पूर्वीही नाशिक येथे राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. शाळेतही विद्यार्थी प्रिय कलाशिक्षक म्हणून त्यांचा विविध उपक्रमांमध्ये सहभाग असतो. विविध सण उत्सव,जयंती, पुण्यतिथी व दिन विशेष या निमित्ताने सुंदर अशा फलक रेखाटनातून सामाजिक संदेश देऊन समाज जागृती करण्याचे कार्य करत असतात. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने परिसरातील ग्रामस्थ, स्कुल कमिटीतील सदस्य व शाळेचे मुख्याध्यापक आर.एम. परदेशी,पर्यवेक्षक श्री. साळुंके व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.
Add a Comment