प्राचार्य भास्कर ठुबे “मा. बाळासाहेब ठाकरे बृहन्मुंबई आदर्श शिक्षक” पुरस्काराने सन्मानित
भास्कर कृष्णाजी ठुबे हे कान्हूर पठार (ता. पारनेर) चे सुपुत्र आणि चेंबूर मुंबई येथील महात्मा ज्युनिअर काॅलेज ऑफ एज्युकेशन चे प्राचार्य आहेत.
राजेंद्र उकिरडे : सह्याद्री माझा
चारकोप कांदिवली : कान्हूर पठार (ता. पारनेर) चे सुपुत्र आणि चेंबूर मुंबई येथील महात्मा ज्युनिअर काॅलेज ऑफ एज्युकेशन चे प्राचार्य भास्कर कृष्णाजी ठुबे यांना आमदार प्रकाशदादा सुर्वे (मागाठणे विधानसभा) यांच्या वाढदिवसानिमीत्त आयोजित शिक्षक महोत्सवात मा. बाळासाहेब ठाकरे बृहन्मुंबई आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्री. ठुबे यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना नुकताच चारकोप कांदिवली येथे झालेल्या शिक्षक महोत्सवात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, समाजसेवक विपुल दोशी, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष शिवाजीराव शेंडगे, अक्षर साहित्य व कला मंचचे संस्थापक दिनेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य भास्कर ठुबे यांची उपक्रमशील शिक्षक, आणि अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून सर्वत्र ओळख आहे. 2017 साली श्री. ठुबे यांना रोटरी क्लब मुंबई तर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार ही मिळाला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
Add a Comment