कविता- अमावस्येच्या रात्री…? कवयित्री- कु. गायत्री वसंत आठवले.

अमावस्येच्या रात्री…?

अमावस्येच्या रात्री येऊन…
काही फायदा असतो का ?
प्रेम कितीही असुदे तरी…
अमावस्येला चंद्र दिसतो का ?

बर ! आलास तो आलास…
मला शोधयची तसदी घ्यायची…!
तुझ्या चुकीच्या वेळी येण्याची…
पुसटशी कल्पना तरी घ्यायची…!!

मीच आले असते ना मग…
मंद दिवा हातात घेऊन…!
त्या मंद प्रकाशात सुद्धा…
तुला काढल असत शोधून…!!

पण त्या धुंद पावसासारखा…
तु अगदीच अचानक आलास…!
आणि मला एकटा माझा वाटणारा तू…
एका क्षणात परका झालास…!!

तरीही मी खूप शोधल तुला…
पण तू कुठेच दिसला नाहीस…!!
आता प्रश्न उरतो फक्त एकच…
पौर्णिमेच्या रात्री का आला नाहीस…???

कु. गायत्री वसंत आठवले.

मु.पो.ता. गुहागर

जि.रत्नागिरी.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *