सर्वेश संजीव जाधव यांच्या चित्रकला प्रदर्शनास खासदार अमोल कोल्हे यांची भेट
युवा कलाकार सर्वेश याचे खासदार कोल्हे यांच्याकडून कौतुक
संजय उकिरडे : सह्याद्री माझा
पुणे : बालगंधर्व कला दालन येथे नुकतेच सर्वेश संजीव जाधव यांचे चित्रकला प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनास खासदार अमोल कोल्हे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन सर्वेश याचे कौतुक केले.
चिरंजील सर्वेश संजीव जाधव (वय वर्षे 18) सध्या तळेगाव दाभाडे येथे नुकतीच इ.12 वी विज्ञान शाखेची परीक्षा दिली असून या चित्रकला प्रदर्शनात याने बनविलेल्या 80 पेंटिंग मांडण्यात आल्या होत्या ही सर्व पेन्टिंग त्याने इ.10 वी. चा शेवटचा पेपर झाल्या पासून गेली दीड वर्षे कोविड 19 च्या लॉक डाऊनच्या काळात बनविली आहे. या प्रदर्शनास शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी आवर्जून भेट दिली व चि. सर्वेश याने बनविलेल्या प्रत्येक चित्राचे निरीक्षण करून माहिती घेऊन कौतुक केले.
इतक्या लहान वयात अशा उच्चप्रतीची चित्रे तयार करणारा जुन्नर तालुक्यातील ओझर येथील एक युवा चित्रकार म्हणून श्री. कोल्हे यांनी स्वतःच्या सत्काराची शॉल चि. सर्वेश यास घालून त्याचाच सत्कार करून कौतुक केले व नवीन होतकरू भावी पिढीस एक मोलाचा संदेश त्यांनी दिला “जर आपल्यात कला गुण ठासून भरलेले असेल तर त्या कलाकारास उंचीवर नेण्या पासून कोणी रोखू शकत नाही “असे मत त्यांनी व्यक्त केले.
नुकत्याच पुणे येथे तीन दिवस चाललेल्या या चित्रकला प्रदर्शनास अनेक मान्यवर, चित्रकार, रसिक व विध्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
Add a Comment