सातेवाडी (ता.अकोले) येथे मुक्ताई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी
कुस्ती आखाड्यात नामवंत मल्लांची हजेरी
सोमनाथ मुठे : सह्याद्री माझा
सातेवाडी (ता. अकोले) : येथील मुक्ताई देवीच्या यात्रे निमित्ताने कुस्ती आखाडा दिमाखदार व गर्दीत साजरा झाला. गावचे भूषण केशव बुळे साहेब यांच्या सकल्पनेतून, गावातील नोकरदारांच्या सहकार्याने, बिरसा ब्रिगेडच्या वतीने आखाड्यात आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमा निकाली कुस्ती काढणाऱ्या पैलवानांना देऊन आखाडा राघोजीमय करण्यात आला.
सातेवाडी ग्रामदैवत मुक्ताई यात्रे निमित्त दि. 19/4/2022 वार-मंगळवार रोजी यात्रा कमिटीने छान नियोजन करुन जंगी कुस्त्यांचा आखाडा आयोजित करण्यात आला होता. अकोले तालुक्यात सातेवाडी येथील कुस्ती आखाड्यात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली होती. अकोले तालुक्यातून अनेक पहिलवानां बरोबरच इगतपुरी, सिन्नर तालुक्यातूनही पैलवानांनी उपस्थिती दाखवून सहभाग घेतला.
आखाड्यात 100 रुपयांपासून कुस्त्यांना सुरुवात करुन शेवटची कुस्ती 2100 रुपयां पर्यंतची झाली. यावेळी बिरसा ब्रिगेड सातेवाडीच्या वतीने निकाली कुस्ती काढणाऱ्या पैलवानांस प्रोत्साहन म्हणून आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे यांची प्रतिमा देण्यात आल्या. बिरसा ब्रिगेडचे मार्गदर्शक, समन्वयक, ज्येष्ठ मार्गदर्शक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, इतर पदाधिकारी व सभासद यांनी योग्य असे नियोजन केले.
यावेळी अध्यक्ष किसन दिघे, उपाध्यक्ष, पंढरीनाथ दिघे, पदाधिकारी डॉ.काशिनाथ मुठे, दत्तू दिघे, अंकुश शिळकंदे, जिजाराम मुठे, लक्ष्मण दिघे, दिनकर दिघे, लक्ष्मण वायळ यांची उपस्थिती होती. तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक शिवराम दिघे, पळसुंदेचे मा. सरपंच पांडूरंग कचरे, लुमा लक्ष्मण मुठे, विठ्ठल गोविंदा दिघे, तसेच समन्वयक धर्मा दिघे सर, भास्कर दिघे सर, केशव मुठे, दुलाजी दिघे चेअरमन सातेवाडी सोसायटी, किसन मुठे वायरमन, भावका मुठे, सखाराम भाऊ मुठे, श्रावण आमृता मुठे, एकनाथ मुठे, लक्ष्मण मुठे मेजर, पुनाजी मुठे हावलदार यांच्या हस्ते प्रतिमा पैलवानांस देण्यात आल्या. पैलवानांना प्रोत्साहन म्हणून तरुण मित्र मंडळ मोरवाडी यांच्या वतीने निकाली कुस्ती काढणाऱ्या पहिलवानांना ढाल देण्यात आली.
बिरसा ब्रिगेडचे शिलेदार, मार्गदर्शक डॉ. काशिनाथ मुठे यांनी वैयक्तिक रक्कम जाहिर करुन कुस्त्या लावल्या. कुस्तीला यात्रा कमिटीच्या वतीने रोख रक्कम देण्यात आली. जवळ जवळ 53 कुस्त्या या आखाड्यात घेण्यात आल्या. शंभर च्या आसपास पैलवानांनी सहभाग नोंदवला. यात्रा कमिटीने अतिशय छान नियोजन केले होते. त्यामुळे नागरिक ,पाहुणे व पैलवान मंडळींनी समाधान व्यक्त केले. 19.4.2022
Add a Comment